E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
‘डमी’ उमेदवाराने दिली ‘नीट’ची परीक्षा
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
पाच वर्षांनंतर प्रकरण उघड, दोघांना अटक; डॉक्टर ताब्यात
जयपूर
: वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट-यूजी परीक्षेसाठी ‘डमी’ उमेदवार बसल्याचे पाच वर्षांनंतर उघडकीस आले. या प्रकरणात दोघांना अटक झाली असून, एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. या प्रकरणात साठ लाखांचा व्यवहार निश्चित झाला होता.
सचिन गौरा असे अटकेतील विद्यार्थ्याचे नाव आहे. तर, अजित गोरा असे ‘डमी’ उमेदवाराचे नाव आहे. सचिनला २०२० मध्ये ‘नीट-यूजी’ परीक्षेत ६६७ गुण मिळाले होते. तो जोधपूरच्या ‘एम्स’मध्ये एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षात शिकत होता. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून प्राप्त अहवालानुसार, नीट यूजी-२०२० मध्ये ६६७ गुण मिळवणारा सचिन गोरा हा परीक्षेला बसला नाही. त्याने डमी उमेदवार परीक्षेसाठी बसविला.
या प्रकरणात दोघांना अटक झाली असून नागौरच्या घाटवा येथे आरोग्य अधिकारी म्हणून काम करणार्या एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे, असे जयपूरचे पोलिस उपायुक्त (पश्चिम) अमित कुमार यांनी सांगितले. सचिनच्या प्रवेश पत्रावर डॉ. अजित गोरा याचे छायाचित्र आढळून आले. घाटवा येथे आरोग्य अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. सुभाष सैनी यांच्यावर अजितला ‘डमी’ उमेदवार म्हणून बसण्यास परवानगी दिल्याचा आरोप आहे. भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर अजित सध्या एक वर्षाची इंटर्नशिप करत आहे. पोलिसांनी सचिन आणि अजित यांना अटक केली असून सैनी यांना ताब्यात घेतले आहे.सैनी याने २०१३ मध्ये नीट-पीजी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी ६५ लाख घेतल्याचेदेखील समोर आले आहे.
Related
Articles
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
स्मिथ मैदानातून थेट रुग्णालयात
15 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक